Showing posts with label पद्ममजा फेनानी. Show all posts
Showing posts with label पद्ममजा फेनानी. Show all posts

पद्ममजा फेनानी - दिवे लागले रे

पद्ममजा फेनानी - जोगळेकर
दिवे लागले रे दिवे लागले रे
शंकर रामाणी

दिवे लागले रे दिवे लागले रे
दिवे लागले रे दिवे लागले रे
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठींच्या दिशा खोल तेजाळताना
दिठींच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जागले
दिवे लागले रे दिवे लागले रे

रित्या ओंजळीत दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले
इथे मी मला मोकळा गुंत्तीताना
उरी गंध काल्लोलुनी फाकले

दिवे लागले रे दिवे लागले रे
दिवे लागले रे दिवे लागले

उभ्या रोमरोमातुनी चैत्र वाटा
कुणी देह यात्रीत या गुंतले
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन
उषा सुप्त ओठात ओथंबले

दिवे लागले रे दिवे लागले रे
दिवे लागले रे दिवे लागले
कुणी जागले रे , कुणी जागले रे
उषा सुप्त ओठात ओथंबले
उषा सुप्त ओठात ओथंबले