हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा 






हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा 
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा 

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि- नंदना 
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना 
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा 

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी 
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले 
जाहलीं राजधान्यांची । जंगले
परदास्य-पराभविं सारीं । मंगले 
या जगति जगूं ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा 

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी 
जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी 
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी 
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा 


 स्वर    -  लता मंगेशकर  गीत    -  स्वातंत्र्यवीर सावरकर


संगीत  - 
पं. हृदयनाथ मंगेशकर

No comments:

Post a Comment

आपण आता मराठी गाणी दिलखुलास डाऊनलोड करू शकता
फकत mymarathimp3 ह्या ब्लोगवर.आपली आवडती मराठी गाणी डाउनलोड करा व संगीताचा आनंद घ्या
आपण mymarathimp3 ला भेट दिल्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे.कृपया आपल्या काही शंका / सूचना किवा आवडत्या गाण्याची Request असल्यास निसंकोच जरूर कळवावे.